पुस्तकाचे नाव- झोंबी
लेखक- आनंद यादव
किंमत-३२०₹, पृष्ठसंख्या-३७९
प्रथम आवृत्ती-डिसेंबर १९८७
झोंबी म्हणजे लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग.बालपण व सुरुवातीच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्याशी केलेली ,झोंबा झोंबी म्हणजे हे पुस्तक.त्यांचे एकूण आत्मचरित्र ४ भागांमध्ये आहे.पुढील पुस्तके नांगरणी,घरभिंती आणि काचवेल ही होत.
पुस्तकाला पु लं ची१६ पानांची प्रस्तावना लाभली आहे.त्यांनी लिहिलेली ही प्रस्तावना वाचली की ह्या पुस्तकाला अजून कुठल्याही समीक्षानाची,अभिप्रायची गरज नाही असे वाटते.अतिशय उत्तम भाषेत पुस्तकाचा लेखाजोखा त्या १६ पानाच्या अर्कात आहे.
प्रचंड पराकोटीची गरिबी,अशिक्षितपणा,शिक्षणाविषयी पालकांची उदासीनता,पोटापाण्यासाठी करावे लागणारे काबाड कष्ट,जेवायलाही मिळेल ना मिळेल ही परिस्तिथी हया सर्वातून लढत झगडत कुठलाही पाठिंबा नसताना,आजूबाजूला फक्त नकारात्मकता दिसत असताना लेखक केवळ शिक्षणाच्या उर्मीने व इच्छेने जगत जातो व काबाड कष्ट करून अतंर्गत बुद्धिमत्ता व कष्ट ह्या जोरावर शिक्षण कसे पुरे करतो हे वाचनीय झाले आहे.
ही कादंबरी मराठी साहित्यातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली,वाचकांचा ग्रामीण जीवनाविषयीचा दृष्टिकोनच बदलून टाकणारी ठरली.सर्वच स्तरावरून तिचं कौतुक झालं.महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार व भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कारवा इतर अनेक पुरस्कार ह्या पुस्तकाला मिळालेत.
पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही केवळ जिद्द आणि चिकटीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करता येते हीच शिकवण ह्या कादंबरीतून मिळते.कादंबरीतील पराकोटीच्या गरिबीचे व इतर प्रसंगाचे वर्णन कित्येकदा अंगावर येते.उत्कृष्ट म्हणून नावाजलेली ही कादंबरी नक्कीच वाचनीय...
२६/५/२०२०