मी जेव्हा जेव्हा एखाद्या मराठी पुस्तकाबद्दल नेटवर शोधायचा प्रयत्न केला तेव्हा तेह मला फार जुजबी माहिती मिळाली किंवा अगदी नाहीच मिळाली म्हटले तरी चालेल.म्हणून येथे मी वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहिणार आहे.जेणेकरून आवड असणारयाना पुस्तके वाचायच्या आधी त्यांची थोडीतरी माहिती मिळेल.मराठी पुस्तकांचे कुठेतरी माहितीपर स्थळ असावे असे मला नेहमीच वाटते.मित्रांनी किंवा अजून कोणी परीक्षणं लिहून हि जागा समृद्ध करावी अशी आतातरी मनी इच्छा आहे.बघू येणाऱ्या काळात कसं जमतंय वाचन ते!