पुस्तकाचे नाव: वाफाळलेले दिवस
लेखक: प्रतिक पुरी
गोल्डन पेज पब्लिकेशन
पाने १५५
किंमत:१७५
प्र आ :एप्रिल १३
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने शालेय जीवनात असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचे मस्त चित्रण केलेलं आहे. मुख्यत्वे आपल्याला काय सांगायचंय ते लेखक सुरुवातीलाच प्रस्तावना असं न लिहिता भूमिका या सदरात मांडतो.
हि भूमिका वाचली कि पुस्तकात काय असणार आहे व कशाबद्दल असणार आहे याची कल्पना येते. लेखकाच्याच शब्दात ते उत्तम प्रकारे मांडता येईल : वयात येणाऱ्या मुलांच्या जीवनात घडणाऱ्या शाररीक आणि मानसिक उलथा पालथीचा वेध "वाफाळलेले दिवस "ह्या कादंबरीत घेतला आहे. पुस्तक हे वयात येण्यासंबंधी आहे. एका आठवीत गेलेल्या मुलाच्या प्रथम पुरुषी निवेदनातून त्याच स्वत:च आणि त्याच्या मित्राचं वयात येणं दर्शवलं गेलं आहे. कादंबरीचा पौगंडावस्थेतिल नायक वयात येताना मनात व शरीरात होणारे बदल कसे स्वीकारतो ,त्यावर त्याच्या काय प्रतिक्रिया उमटतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
कथेचा नायक त्याचं कुटुंब ,मित्रपरिवार -दुनियादारी माहित असलेला इरसाल मित्र नित्या, अव्या, गौरु,वर्गमैत्रिणी व निंबाळकर म्हणजे कथेची नायिका ,ह्यामधून गुंफत कथा पुढे जात राहते .त्यमधे लेखकाने पौगंडावस्थेतील अनेक स्तिथ्यंतऱ हाताळली आहेत तीदेखील रोकठोक शब्दात.
लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे यातील भाषा शिवराळ व अश्लील असण्याचा आरोप / आक्षेप असू शकतो पण त्यात अतिशयोक्ती मात्र नाही,कथानायक हाच कथा सांगत असल्यामुळे भरपूर प्रमाणात शिव्यांचा वापर व रावडी बोलीभाषेचा वापर होतो. हा वापर पूर्णपणे नाकारता येत नसला तरी अगदी सरसकट सर्वांच्या बाबतीत मात्र हे पचनी पडेल असे नव्हे. म्हणजे सरसकट प्रत्येक शाळकरी मुलगा हीच भाषा वापरतो असे नव्हे त्यामुळे साहजिकच कादंबरी सामान्य वाचाकांसाठी किंवा पांढरपेश्या स्वभावाच्या वाचकांसाठी तरी( विशेषतः मराठी साहित्यात इतके रोकठोक लिखाण क्वचितच आढळते असे असताना)किंचित अश्लीलतेकडेच झुकणारी आहे असे माप पडेल .तरी कादंबरी जशी ज्याच्या मनाला भिडेल /पटेल तसा त्याचा त्याने तिने स्वीकार करावा व करूही नका असं लेखकाने सांगीतलच आहे.
एकूण लेखन छान आहे . तरी काही वाक्ये कृत्रिम वाटतात (आपण साले साहित्यिक तर नाही ना बनणार)तर काही वेळा काही घटना न्याचरली येत नाहीत असे वाटते. पण ते अपवादात्मक.एकुन लेखकाची प्रथम कादंबरी असूनदेखील स्तुत्य लेखन केले आहे. नजीकच्या काळात दुसरा विषय हाताळताना किंवा वाचकांनी वाचताना लेखकाची खरी कस लागेल.