Thursday, 29 August 2013

यक्षांची देणगी -जयंत नारळीकर (yakshachi denagi -jayant naralikar )

पुस्तकाचे नाव : यक्षाची देणगी   लेखक :जयंत नारळीकर  मौज प्रकाशन पाने २३७  किंमत: १५०


 जयंत नारळीकर हे नावाजलेले वैज्ञानिक व लेखकही. त्यांच्या मते विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा प्रचार आवश्यक आहे अनेक माध्यमे उपलब्ध असली तरीही वैज्ञानिकांमध्ये ह्याबाबतीत उदासीनता दिसून येते. प्रस्तावनेत त्यांनी लिहिलेय कि "विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल तर त्याला साखरेचे कोटिंग म्हणजे कथेचे रुपं देणे योग्य ठरेल. विज्ञानकथा अशा उद्देशाने लिहिल्या जाव्यात असे मला वाटते व निदान मी लिहितो त्या कथा तरी ह्याच उद्देशाने लिहिलेल्या आहेत".
               पुस्तकात एकूण १२   कथा आहेत व त्या सगळ्या सुरस आहेतच व आपल्याला बरीच नवीन वैज्ञानिक माहिती देतात जी रोज ऐकुन पण आपण दुर्लक्षित करतो अशीही . अनेक कथांमधून आपल्याला नवनवीन माहिती मिळत जाते. पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. हातात  घेतल्यावर खाली ठेवावे असे वाटत नाही . लेखनशैलीही छान  आहे.

1 comment:

  1. मी शाळेत असताना यातली एक गोष्ट वाचली. पण हे बुक सध्या मिळतच नाहीये. कुठे असेल तर please कळवा. PDF पण चालेल.

    ReplyDelete