पुस्तकाचे नाव: आंधळ्याच्या गायी
लेखिका:मेघना पेठे
राजहंस प्रकाशन
पाने: १४३
किंमत:१५०
प्र आ : जून २०००
पुस्तकाबद्दल बरच बर वाईट ऐकुन होतो. लेखिकेच मी वाचलेलं नतिचरामी सामान्य मराठी वाचकासाठी तरी धाडसी लेखनामध्ये मोडतं त्यानंतर लेखिकेच वाचलेल दुसरं पुस्तक. हा कथासंग्रह आहे एकूण ५ कथांचा ज्या पूर्वी दिवाळी मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
प्रत्येक कथा वेगवेगळ्या जौनरची ,वेगवेगळे विषय ,जबरदस्त लिखाण शैली (आता ह्यामध्ये लेखिकेच बिनधास्त लिहीण पण आलच ,जे काहीना अनावश्यक वाटत तर काहीना कथेची पात्रांची गरज वाटत उदा . मग ते व्यक्तीच वर्णन असो किंवा सेक्स बद्दल लिहिलेलं असो किंवा शिव्यांचा वापर असो ) . माझ्याबद्दल बोलायच झालं तर मला ते धाडसी वाटत…जीवनाकडे बघायचा ,ते व्यक्त करायची प्रत्येकाची आपापली स्टाईल असते लेखकांची तर ती युनिक असते त्यामुळे मग पुढचा कीस काढत पुस्तक /लिखाण बाजूला पडाव अस मात्र होऊ नये,असो आता पुस्तकाकडे वळतो
पहिली कथा "एक ननैतिक बघ्या "एका प्रौढ मुलाची ज्यात त्याचा बालपण कसं हरवल, त्याच्या मनाचे हिंदोळे ,कुत्र्या बरोबरचा त्याचा संवाद मस्त . तितकीशी नाही जमलीये पण एकूण ठीक .
दुसरी कथा -आये कुछ अभ्र हि तारुण्य उलटून जाणारया तरीही लग्न न जमत असलेल्या तरुणीची गोष्ट. त्यात तिच्या कदाचित होणारया नवरयाबरोबर तिची भेट,तिचे अनुभव ,हिजड्या बरोबरचा प्रसंग ,तिची मनोवस्था ,मस्त लिहिलेय.
बाकी कथा अठरावा उंट ,सादोहरा व "आस्था आणि गवारीची भाजी" पण छान आहेत .शेवटची कथा मस्त जमलीये. धड एक कशावर पाय नसलेला ,प्रौढ साक्षरता अभियाणात गर्क असलेला,स्वताच्याच आयुष्यात रमणारा ,मौजमजा करणारा नवरा,तात्विक चर्चेत अग्रेसर ----, कामामुळे गांजून गेलेली,नवर्याची अपेक्षित साथ न लाभणारी ,संसाराचा गाडा चालवणारी ,मानसिक कोंडमारा झालेली त्याची बायको,------,स्वताः च्या टर्म्स वर आयुष्य जगणारी ,नवर्याबरोबर पूर्वी लिव इन असणारी,कॅपेबल व इण्डिपेण्डनट अशी त्याची प्रेयसी ह्या सगळ्याची कथा म्हणजे आस्था आणि गवारीची भाजी .पुस्तक एकूण ठीक आहे . म्हनजे एकदातरी जरूर वाचावे असे. काहीजणांना त्यातील भाषेवर आक्षेप असेल तरी लेखिकेची ताकत आपण बाजूला सारू शकत नाही . लेखिकेची मागे सांगितल्याप्रमाणे प्रसंग सांगण्याची शैली,कथा सादर करण्यची शैली,लेखनाची हातोटी निर्विवाद आहे.
मल पृष्ठावरील वाक्य:
"घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणा-या या आंधळ्याच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...! आणि आंधळा? तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत रहातो"
पुस्तक श्राव्य स्वरुपात देखील उपलब्ध आहे:
http://www.maanbindu.com/new-marathi-audio-book-Aandhalyachya-Gayi
( ३.५ /५ )
प्रशांत मयेकर २८/४/१३ १५: ५०

No comments:
Post a Comment