Sunday, 23 December 2012

स्वातंत्र्य आले घरा--जी ए कुलकर्णी (swatantrya ale ghara--GA)

पुस्तकाचे नाव:स्वातंत्र्य आले घरा  (the free  man  )           लेखक :कॉनराड रिक्टर                  अनुवाद: जी ए कुलकर्णी
परचुरे प्रकाशन मंदिर           प्र आ:१९६८    द्वि आ:२०१०              किंमत:१२५           पाने:११४

हि कहाणी आहे हेन्री डेलीकर उर्फ हेन्री फ्री man  याची.जर्मनी मधल्या राइन नदीकाठचा हा मुलगा गुलाम म्हणून अमेरिकेला आणला जातो तिथे त्याला मिळालेली वागणूक,त्याचे स्वंतत्र विचार,त्याला भेटलेली  घर मालकीण ,त्याचे मित्र,स्वतन्त्रतेसाठी त्याने सुरु केलेले प्रयत्न,गुलामाचे जीवन ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक होय;
हेन्री ला त्याच्या विचारामुळेच  फ्री हे आडनाव पडते.फिलाडेल्फिया ला आल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलते ह्याचे साग्रसंगीत वर्णन ह्या पुस्तकात आहे.तत्कालीन गुलामांची  कशा प्रकारे ने आण व्हायची, कशी कामे त्यांना करावी लागायची याची छान माहिती मिळते(ह्यासाठी अच्युत गोडबोलेंच गुलाम मात्र जरुर  वाचावं )एकंदरीत GA चा पुस्तक म्हणून ठीक आहे पण मला तितकस नाही आवडल .म्हणजे एक कथा म्हणून ठीक पण आवर्जून वाचावे असे मात्र नाही.अनुवादित असल्यामुळे  G A न्च्या मुळ  लेखनाची मजा  ह्यात वाटत नाही .

Saturday, 22 December 2012

दुनियादारी --सुहास शिरवळकर (duniyadari--suhas shirwalkar)

पुस्तकाचे नाव :दुनियादारी      लेखक:सुहास शिरवळकर      पाने:२७२       शशिदीप प्रकाशन  किंमत :२५०

           





 दुनियादारीवर ब्लॉग लिहायला घेतला आणि मग कथेच्या आठवणीत गेल्यावर सुन्न व्हायला झालं.पुस्तक चांगलं असणं,पुस्तक आवडणं /नावडणं,पुस्तक बेहद्द आवडणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत."दुनियादारी"ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मनात घर करून राहिलेली कादंबरी आहे. पुस्तकात काय आहे हे सागायला शब्द मिळत नाहीत इतकी ती खोल विचार करायला लावते,तिच्याबरोबर जगायला लावते,अनुभवायला लावते." लावते" हा शब्दच योग्य आहे कारण एकदा का ती वाचायला सुरुवात केली आपण गुंतत जातो,एवढे कि त्यातून बाहेर पडण कठीण होऊन जातं.कथानकाचा काळ  जरी अगदी आजचा नसला तरी
                                              ही आहे एक काल्पनिक सत्यकथा !
                                              तुमची, माझी, आपल्या मित्रांची.
                                              घराघरांतून नित्य घडत असणारी.
                                              म्हणूनच,
                                              जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी,
                                              आनंद-दुख,
                                              प्रेम - मत्सर ... या भावना मानवी मनात
                                              अनंत आहेत ; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये
                                              मानसिक अंतर आहे, तोपर्यंत
                                              ही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली
                                              सत्यकथा अमर आहे.
                          सु शि नि वयाच्या केवळ २४व्या वर्षी लिहिलेली मास्टर पीस कादंबरी.ती वाचताना आपण त्यातील पात्रांशी एवढे एकरूप होऊन जातो कि त्यातील काही  पात्रांमध्ये  आपण स्वताला पाहतो तर काहीमध्ये आपल्या मित्रांना तर काहीमध्ये आपल्या नातेवाईकांना .पात्र एवढी जिवंत कि कुणा न कुणाची तरी आठवण व्हावीच.
     श्रेयस तळवलकर हा साधा सालस निरागस कॉलेजमध्ये नुकताच जाऊ लागलेला कथानायक (तस कथानायक नाही  म्हणू शकत दिग्या ,MK ,राणीमा,मिनू सगळेच कथानायक).sp कॉलेज ,dsp उर्फ दिग्या ,mk ,शिरीन,मिनू,राणी मां ,नितीन अश्य्क्या ,साईनाथ ह्या सगळ्याबरोबर त्याचा आयुष्य पुढे सरकत व दुनियादारी माहित नसलेला श्रेयस त्याच दुनियादारीत कसा जगतो ,रमतो ते लेखकाने अक्षरशः जिवंत केलय.
   एक एक पात्रांबद्दल लिहायला लागल्यास पानेच्या पाने पुरनार नाहीत पण पुस्तक वाचून जो अनुभव येईल तो नाही देता  येणार.मित्रांसाठी जीव  टाकणारा ,चार फटके द्यायची व घ्याच्यची हिम्मत असणारा  बिनधास्त ,निरागस,बेताल ,निर्भीड दिग्या मनाला चटका लावतो.
                    MK च पात्रं ,त्याचे श्रेयस शी संवाद ,एके काळी प्रेम  केलेल्या व ती न मिळाल्यामुळे सगळा आयुष्य दारूच  आपली सोबती असा जगणाऱ्या ,जगण्याची भन्नाट philosophy सांगणाऱ्या mk च्या  बेवडा असूनही आपण त्याच्या प्रेमात पडतो. 
   कट्ट्यावरचे अवली मित्र,समंजस मैत्रीण ,न आवडणारा पण बेहद्द प्रेम करणारा नवरा असूनही आयुष्यातला काहीतरी राहून गेल्यामुळे दुखी असलेली राणीमा सगळेच बेस्ट.प्रत्येकजण आपापल्या जागी कधी बरोबर कधी चूक एकंदरीत ज्याच्या त्याच्या दृष्टीने बरोबरच.
     हसायला तितकीच रडायला लावणारी हि कादंबरी कित्येक वर्षांनी क्वाचली तरी तितकीच भावते,आवडते,हसवते व रडवतेहि !!!!!!!
सु शी नि पुस्तकाबद्दल लिहिलेल्या प्रस्तावना :
दिग्या, श्रेयस, नितीन, अश्क्या, साईनाथ, प्रीतम, शिरीन, मिनू, राणी मां आणि एम्‌.के.’दुनियादारी’तली ही पात्र ज्यांच्यामुळ निर्माण झाली,त्या ’कट्टा गँग’ला- -सुहास शिरवळकर
त्या सर्व वाचकांना,ज्यांनी 'दुनियादारी'विकत घेतली;वाचनालयातून वाचली;मित्राची ढापली;वाचनालयाची पळवली...पण 'दुनियादारी'वर मनापासून प्रेमच केलं!त्यांनाही,ज्यांनी "दुनियादारी"च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला!आणि....खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम 'कट्टा-गँग्ज'ना,ज्या"दुनियादारी" जगल्या..जगतात...जगतील! -सुहास शिरवळकर
           ( नेट वर एक सुशी वेड्याने ब्लॉग लिहिलंय त्यांच्यावर ...अप्रतिम आहे....त्यातही दुनियादारी वर वाचक परीक्षण लिहिलेले आहे ते तर अप्रतिम आहे जरूर वाचावे
http://suhasshirvalkar.blogspot.in/2010/05/blog-post.html#comment-form   )

Thursday, 13 December 2012

द अफगाण लेखक:Frederick Forsyth मराठी अनुवाद: बाळ भागवत

पुस्तकाचे नाव: द अफगाण    लेखक:Frederick Forsyth    मराठी अनुवाद: बाळ  भागवत 

मेहता पब्लिशिंग हाउस     पाने:२७४

 
                        अल कायदा करत असलेल्या कटाची माहिती अमेरीका व ब्रिटीश सिक्रेट सर्विसेसना  होते."अल-हिस्र" अस प्लानचं  नाव तर कळतं पण प्लान काय आहे ते नाही कळू शकत जंग जंग पछाडूनही .इझ मत खान नावाचा एक अतिरेकी (तालिबान कमांडर )अमेरिकेच्या  तुरुंगात खितपत पडलेला असतो. मग CIA त्यांच्या माईक मार्टिन नावाच्या प्याराशूट रेजिमेंट च्या ex लेफ्टनंट   लाच इझ्मात खान म्हणून अल कायदा मध्ये घुसवायचा प्लान करतात.त्यासाठी त्याला कुराणाचे ,त्यांच्या इतर गोष्टींचे ट्रेनिंग देतात.या दरम्यान मूळ इझमत खानला एका रिमोट जागेवर कैद करून ठेवतात.मग सुरु होते वेगवान कथानक.माईक मार्टिन त्यांच्यात घुसून स्वत: इझ्मात खान असल्याचा कस पटवून देतो ,कसा त्यांच्या प्लानचा छडा लावतो ते सगळे लेखकाने अतिशय उत्कंठा वर्धक शब्दात लिहिलेले आहे.
       CIA किंवा इतर सिक्रेट सर्विसेस कशा काम करतात हे वाचून तोंडात बोटं जातात.आधुनिक technology  दहशद्वादाविरोधात किंवा त्याचबरोबर दहशद्वाद्यांकडून कशी वापरली जाते हे लेखकाने छान लिहिले आहे.अल कायदा बद्दल नुसता उल्लेख नाही तर काही छान माहिती त्यातल्या नेत्यांचा उदय असे कितीतरी मुद्दे लेखकाने मस्त हाताळले आहेत.बाळ  भागवतांचा अनुवाद  मस्तच.अर्थात मी पुस्तक फक्त मराठीतच वाचलंय पण मस्त अनुवाद केलाय.
                 

मुक्तांगणची गोष्टं --अनिल अवचट( muktanganchi goshta--anil avchat)

पुस्तकाचे नाव : मुक्तांगणची गोष्टं      लेखक :अनिल अवचट       समकालीन प्रकाशन      पाने:१७३

      मुक्तांगण पुणे स्थित व्यसनमुक्ती केंद्र ...अनिल अवचट व त्यांच्या स्व. पत्नी सुनंदा यांनी सुरु केलेलं,चालवलेलं,वाढवलेलं,अनुभवलेलं आणि जगलेलं ....ह्या पुस्तकात अगदी सुरुवातीपासूनच्या आठवणी त्यांनी दिलेल्या आहेत....व्यसनाधीनांचे अनुभव.....त्यांचे व्यसन सोडतानाचे अनुभव , सोडल्यानन्तरचे अनुभव  ,त्यासाठी लेखकाने व त्यांच्या पत्नीने मनापासून केलेली मेहनत  ,उभारलेलं इन्फ्रा structur ,त्यातून मिळालेली माणस...बहुतेक सगळी  चांगलीच काही वाईट ...!आपल्याला व्यसनाच्या जगाची,व्यसनिंच्या जगाची, त्यांच्या सुख-दुखाची, गरजांची जवळून ओळख होते व वेगळच विश्व उलगडत जातं  व एक नवीन अनुभव देउन जातं .छान  पुस्तक आहे.
               लेखकाच्या पत्नी म्हणजे एक ग्रेट व्यक्तिमत्व होत,वाचताना आपण भारावून जातो व विशेषता त्यांच त्यांच्या पत्नीवरच प्रेम,आदर बघून तर अजुनच!!!जरूर वाचावे !!

Wednesday, 12 December 2012

नातिचरामि--मेघना पेठे (naticharami-megna pethe)


पुस्तकाचे नाव: नातिचरामि                 लेखिका:मेघना पेठे           राजहंस प्रकाशन

पाने: ३३५           किमत:२५०                    प्रथम आवृत्ती: २६ जा २००५


कथेची नायिका मीरा ,तीची दोन लग्न,तिचे नवरे ,तिच आयुष्य,स्वभाव,मतभेद इत्यादीचा वर्णन म्हणजे नातिचरामि  .ह्या शब्दाचा अर्थ "till date do us apart".मला कादंबरी तितकीशी आवडली नाही पण लेखनाचा फ्लो छान आहे. मीराच  पात्र हे एका  हेकेखोर,मूर्ख,स्वताची काही वेगळीच मते (व तीच योग्य असं वाटणाऱ्या)असलेल्या एका विशिष्ट  व्यक्तीच चित्रण आहे.त्यात आपण गुंतून पडतो.काही ठिकाणी मस्त मतं मांडली आहेत.पुस्तकातील भाषा हा कित्येक जनासाठी कळीचा मुद्दा आहे.सेक्सबद्दल उघडपणे लिहिलेले आहे,किंवा शिव्याचा वापर बरेच ठिकाणी केलेला आहे.असो.मीराचा पत्र लक्षात घेतला तर तेही समजोन जात.एकूण मलातरी जस काही लोक म्हणतात कि masterpiece किंवा आवर्जून वाचावी अशी काही वाटली नाही



पुस्तकातील काही वाक्ये:

पत्रिका?म्हणजे काय असतं ?मला खरच ते ठाऊक नाही .पण आपल्यासारख्याच एका अपूर्ण थोड्या कमी थोड्या जास्त पण अपूर्णच माणसाने केलेल्या अंदाजावर आपण आपला आयुष्य बेतायच?मग आपल्या इच्छा अपेक्षा उमेदिंवर का नाही बेतायचं?
एखाद्याला एखादी व्यक्ती एका विशिष्ट भूमिकेत नाही पटत अथवा मानवत अथवा भावत ,तर राहिलं.यात दोष अथवा न्यून कोणाचंच मानण्याच कारण नाही.सगळ्यांना आपले रक्ताचे नातेवाईक कुठे पटतात किंवा आवडतात?मग जिथं निवडीची मुभा आहे तिथ तर ते ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार असायला हवा आणि तो राबवण्याची मुभाही हवी.
न बोलणाऱ्या माणसाचं काही कळतच नाही,काय काय आतल्या आत चाललं असेल?
कुणी आपल्याला प्रश्न विचारणार नसताना ,कुणालाही जबाबदार असण्याचं आपल्यावर बंधन नसताना आपणच आपल्यासाठी आणि आपल्यापुरते नियम बनवणं,हि आपली नैतिकता.आपणच आपल्यासाठी केलेले नियम कुणाच्याही नकळत पाळणं हि फार मोठी गोष्ट आहे.
माझ्या जगण्यातूनच मला काहीही चूक आहे कि बरोबर,योग्य कि अयोग्य,चांगल कि वाईट हे कळू शकल पाहिजे आणि कळल्यावर पटल पाहिजे.हा हट्ट जगण्याला मूल्य देतो आणि माझ्या जगण्याला मूल्य देण माझ कर्तव्य आहे .
व्यसनाचा कंटाळा आला तरी ते सुटत नाही .मुळात ते कशापासून तरी पळण्यासाठी ना जडलेल असत !
प्रत्येकाचा choice हा त्याचा स्वंतंत्र सुभा आहे त्यात ठरवूनही दुसरया  कुणाला चंचू प्रवेशाचीही मुभा नाही .
समुद्रावर कधी कधी एक वर्तमान क्षणाच असा नुसता क्षितिजापर्यंत झुलत राहतो .आठवणीच येत नाहीत आणि कधी कुठल्याही आठवणी येतात,अगदी आधीच्या मग आत्ताच्या ,मग मधल्याच.