Wednesday, 12 December 2012

नातिचरामि--मेघना पेठे (naticharami-megna pethe)


पुस्तकाचे नाव: नातिचरामि                 लेखिका:मेघना पेठे           राजहंस प्रकाशन

पाने: ३३५           किमत:२५०                    प्रथम आवृत्ती: २६ जा २००५


कथेची नायिका मीरा ,तीची दोन लग्न,तिचे नवरे ,तिच आयुष्य,स्वभाव,मतभेद इत्यादीचा वर्णन म्हणजे नातिचरामि  .ह्या शब्दाचा अर्थ "till date do us apart".मला कादंबरी तितकीशी आवडली नाही पण लेखनाचा फ्लो छान आहे. मीराच  पात्र हे एका  हेकेखोर,मूर्ख,स्वताची काही वेगळीच मते (व तीच योग्य असं वाटणाऱ्या)असलेल्या एका विशिष्ट  व्यक्तीच चित्रण आहे.त्यात आपण गुंतून पडतो.काही ठिकाणी मस्त मतं मांडली आहेत.पुस्तकातील भाषा हा कित्येक जनासाठी कळीचा मुद्दा आहे.सेक्सबद्दल उघडपणे लिहिलेले आहे,किंवा शिव्याचा वापर बरेच ठिकाणी केलेला आहे.असो.मीराचा पत्र लक्षात घेतला तर तेही समजोन जात.एकूण मलातरी जस काही लोक म्हणतात कि masterpiece किंवा आवर्जून वाचावी अशी काही वाटली नाही



पुस्तकातील काही वाक्ये:

पत्रिका?म्हणजे काय असतं ?मला खरच ते ठाऊक नाही .पण आपल्यासारख्याच एका अपूर्ण थोड्या कमी थोड्या जास्त पण अपूर्णच माणसाने केलेल्या अंदाजावर आपण आपला आयुष्य बेतायच?मग आपल्या इच्छा अपेक्षा उमेदिंवर का नाही बेतायचं?
एखाद्याला एखादी व्यक्ती एका विशिष्ट भूमिकेत नाही पटत अथवा मानवत अथवा भावत ,तर राहिलं.यात दोष अथवा न्यून कोणाचंच मानण्याच कारण नाही.सगळ्यांना आपले रक्ताचे नातेवाईक कुठे पटतात किंवा आवडतात?मग जिथं निवडीची मुभा आहे तिथ तर ते ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार असायला हवा आणि तो राबवण्याची मुभाही हवी.
न बोलणाऱ्या माणसाचं काही कळतच नाही,काय काय आतल्या आत चाललं असेल?
कुणी आपल्याला प्रश्न विचारणार नसताना ,कुणालाही जबाबदार असण्याचं आपल्यावर बंधन नसताना आपणच आपल्यासाठी आणि आपल्यापुरते नियम बनवणं,हि आपली नैतिकता.आपणच आपल्यासाठी केलेले नियम कुणाच्याही नकळत पाळणं हि फार मोठी गोष्ट आहे.
माझ्या जगण्यातूनच मला काहीही चूक आहे कि बरोबर,योग्य कि अयोग्य,चांगल कि वाईट हे कळू शकल पाहिजे आणि कळल्यावर पटल पाहिजे.हा हट्ट जगण्याला मूल्य देतो आणि माझ्या जगण्याला मूल्य देण माझ कर्तव्य आहे .
व्यसनाचा कंटाळा आला तरी ते सुटत नाही .मुळात ते कशापासून तरी पळण्यासाठी ना जडलेल असत !
प्रत्येकाचा choice हा त्याचा स्वंतंत्र सुभा आहे त्यात ठरवूनही दुसरया  कुणाला चंचू प्रवेशाचीही मुभा नाही .
समुद्रावर कधी कधी एक वर्तमान क्षणाच असा नुसता क्षितिजापर्यंत झुलत राहतो .आठवणीच येत नाहीत आणि कधी कुठल्याही आठवणी येतात,अगदी आधीच्या मग आत्ताच्या ,मग मधल्याच.

5 comments:

  1. मीराच पात्र हे एका अपवादात्मक ,आधुनिक व त्याचवेळी वेगळ्या विचारसरणीच्या एका मुलीच पात्र आहे...अशी व्यक्ती समाजात असूही शकते नसूही शकते..अर्थात नसूच शकत नाही असे नाही...लेखिकेने काल्पनिक व अकाल्पनिक प्रसंगांच मिश्रण करून पुस्तक लिहिलेल आहे.मी जे वर म्हटल ते म्हणजे शिव्या किवा बिनधास्त वाक्य हि प्रसंगाला अनुसरूनच येतात व त्या व्यक्तिरेखेचा समर्थन करतात..मग तुम्हाला मीरा आवडो व न आवडो ...तिची कहाणी उलगडत जाते...

    ReplyDelete
  2. मलाही या पुस्तकाचं परीक्षण हवं होतं..ते शोधताना हा ब्लॉग दिसला............परंतु पुस्तकाबद्दल माहिती कमी वाटली

    ReplyDelete
    Replies
    1. Ani meera la chukicha portray kela gelay. asa mala watta.

      Delete
    2. baghnyacha drushtikon vegvegala asu shakto...pahilya commentmadhye mhnunach mi punha addition keli hoti...

      Delete
    3. @अर्धांगी :संक्षिप्त कथा सांगण्यात अर्थ नाही असे वाटले म्हणून जास्त विस्ताराने नव्हते लिहिले त्यावेळी. होप तुम्ही पुस्तक वाचले असेल...

      Delete