पुस्तकाचे नाव: द अफगाण लेखक:Frederick Forsyth मराठी अनुवाद: बाळ भागवत
मेहता पब्लिशिंग हाउस पाने:२७४
अल कायदा करत असलेल्या कटाची माहिती अमेरीका व ब्रिटीश सिक्रेट सर्विसेसना होते."अल-हिस्र" अस प्लानचं नाव तर कळतं पण प्लान काय आहे ते नाही कळू शकत जंग जंग पछाडूनही .इझ मत खान नावाचा एक अतिरेकी (तालिबान कमांडर )अमेरिकेच्या तुरुंगात खितपत पडलेला असतो. मग CIA त्यांच्या माईक मार्टिन नावाच्या प्याराशूट रेजिमेंट च्या ex लेफ्टनंट लाच इझ्मात खान म्हणून अल कायदा मध्ये घुसवायचा प्लान करतात.त्यासाठी त्याला कुराणाचे ,त्यांच्या इतर गोष्टींचे ट्रेनिंग देतात.या दरम्यान मूळ इझमत खानला एका रिमोट जागेवर कैद करून ठेवतात.मग सुरु होते वेगवान कथानक.माईक मार्टिन त्यांच्यात घुसून स्वत: इझ्मात खान असल्याचा कस पटवून देतो ,कसा त्यांच्या प्लानचा छडा लावतो ते सगळे लेखकाने अतिशय उत्कंठा वर्धक शब्दात लिहिलेले आहे.
CIA किंवा इतर सिक्रेट सर्विसेस कशा काम करतात हे वाचून तोंडात बोटं जातात.आधुनिक technology दहशद्वादाविरोधात किंवा त्याचबरोबर दहशद्वाद्यांकडून कशी वापरली जाते हे लेखकाने छान लिहिले आहे.अल कायदा बद्दल नुसता उल्लेख नाही तर काही छान माहिती त्यातल्या नेत्यांचा उदय असे कितीतरी मुद्दे लेखकाने मस्त हाताळले आहेत.बाळ भागवतांचा अनुवाद मस्तच.अर्थात मी पुस्तक फक्त मराठीतच वाचलंय पण मस्त अनुवाद केलाय.

No comments:
Post a Comment