पुस्तकाचे नाव :दुनियादारी लेखक:सुहास शिरवळकर पाने:२७२ शशिदीप प्रकाशन किंमत :२५०
दुनियादारीवर ब्लॉग लिहायला घेतला आणि मग कथेच्या आठवणीत गेल्यावर सुन्न व्हायला झालं.पुस्तक चांगलं असणं,पुस्तक आवडणं /नावडणं,पुस्तक बेहद्द आवडणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत."दुनियादारी"ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मनात घर करून राहिलेली कादंबरी आहे. पुस्तकात काय आहे हे सागायला शब्द मिळत नाहीत इतकी ती खोल विचार करायला लावते,तिच्याबरोबर जगायला लावते,अनुभवायला लावते." लावते" हा शब्दच योग्य आहे कारण एकदा का ती वाचायला सुरुवात केली आपण गुंतत जातो,एवढे कि त्यातून बाहेर पडण कठीण होऊन जातं.कथानकाचा काळ जरी अगदी आजचा नसला तरी
ही आहे एक काल्पनिक सत्यकथा !
तुमची, माझी, आपल्या मित्रांची.
घराघरांतून नित्य घडत असणारी.
म्हणूनच,
जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी,
आनंद-दुख,
प्रेम - मत्सर ... या भावना मानवी मनात
अनंत आहेत ; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये
मानसिक अंतर आहे, तोपर्यंत
ही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली
सत्यकथा अमर आहे.
सु शि नि वयाच्या केवळ २४व्या वर्षी लिहिलेली मास्टर पीस कादंबरी.ती वाचताना आपण त्यातील पात्रांशी एवढे एकरूप होऊन जातो कि त्यातील काही पात्रांमध्ये आपण स्वताला पाहतो तर काहीमध्ये आपल्या मित्रांना तर काहीमध्ये आपल्या नातेवाईकांना .पात्र एवढी जिवंत कि कुणा न कुणाची तरी आठवण व्हावीच.
श्रेयस तळवलकर हा साधा सालस निरागस कॉलेजमध्ये नुकताच जाऊ लागलेला कथानायक (तस कथानायक नाही म्हणू शकत दिग्या ,MK ,राणीमा,मिनू सगळेच कथानायक).sp कॉलेज ,dsp उर्फ दिग्या ,mk ,शिरीन,मिनू,राणी मां ,नितीन अश्य्क्या ,साईनाथ ह्या सगळ्याबरोबर त्याचा आयुष्य पुढे सरकत व दुनियादारी माहित नसलेला श्रेयस त्याच दुनियादारीत कसा जगतो ,रमतो ते लेखकाने अक्षरशः जिवंत केलय.
एक एक पात्रांबद्दल लिहायला लागल्यास पानेच्या पाने पुरनार नाहीत पण पुस्तक वाचून जो अनुभव येईल तो नाही देता येणार.मित्रांसाठी जीव टाकणारा ,चार फटके द्यायची व घ्याच्यची हिम्मत असणारा बिनधास्त ,निरागस,बेताल ,निर्भीड दिग्या मनाला चटका लावतो.
MK च पात्रं ,त्याचे श्रेयस शी संवाद ,एके काळी प्रेम केलेल्या व ती न मिळाल्यामुळे सगळा आयुष्य दारूच आपली सोबती असा जगणाऱ्या ,जगण्याची भन्नाट philosophy सांगणाऱ्या mk च्या बेवडा असूनही आपण त्याच्या प्रेमात पडतो.
कट्ट्यावरचे अवली मित्र,समंजस मैत्रीण ,न आवडणारा पण बेहद्द प्रेम करणारा नवरा असूनही आयुष्यातला काहीतरी राहून गेल्यामुळे दुखी असलेली राणीमा सगळेच बेस्ट.प्रत्येकजण आपापल्या जागी कधी बरोबर कधी चूक एकंदरीत ज्याच्या त्याच्या दृष्टीने बरोबरच.
हसायला तितकीच रडायला लावणारी हि कादंबरी कित्येक वर्षांनी क्वाचली तरी तितकीच भावते,आवडते,हसवते व रडवतेहि !!!!!!!
सु शी नि पुस्तकाबद्दल लिहिलेल्या प्रस्तावना :
दिग्या, श्रेयस, नितीन, अश्क्या, साईनाथ, प्रीतम, शिरीन, मिनू, राणी मां आणि एम्.के.’दुनियादारी’तली ही पात्र ज्यांच्यामुळ निर्माण झाली,त्या ’कट्टा गँग’ला- -सुहास शिरवळकर
त्या सर्व वाचकांना,ज्यांनी 'दुनियादारी'विकत घेतली;वाचनालयातून वाचली;मित्राची ढापली;वाचनालयाची पळवली...पण 'दुनियादारी'वर मनापासून प्रेमच केलं!त्यांनाही,ज्यांनी "दुनियादारी"च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला!आणि....खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम 'कट्टा-गँग्ज'ना,ज्या"दुनियादारी" जगल्या..जगतात...जगतील! -सुहास शिरवळकर
( नेट वर एक सुशी वेड्याने ब्लॉग लिहिलंय त्यांच्यावर ...अप्रतिम आहे....त्यातही दुनियादारी वर वाचक परीक्षण लिहिलेले आहे ते तर अप्रतिम आहे जरूर वाचावे
http://suhasshirvalkar.blogspot.in/2010/05/blog-post.html#comment-form )

2 divsch zale pustk vachun ,kharach 1 no. pustk ahe,ani tyat mi pn sp mdhe aslyamule mala" DUNIYADARI" pustak KHUPavdle
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteI had watched n red duniyadaari for hundreds of time.... Each time it touches the heart.... Gives a feeling that every character mentioned in book is somehow related to every person and every scene is related to every walk of life.... It teaches us how to follow bond of friendship, relationship n difference between love n attraction..... The most sensitive movie I have ever watched n most sensitive book I have ever read....
ReplyDeleteThank you
if want buy pdf book how can i get it
ReplyDeleteDuniyadari jri kalpanik katha asli tri ti aplyach ayushyashi sambandhit ahe ashi pratyekachi bhawana ahe mi aaj war 100 peksha jast Vela he pustak wachalel ahe pan pratyek weles mi tya madhe itki harwun gele ahe ki ani aaj agdi wastvik jiwnat tech anubhaw milat ahet pratyek mansach vyaktichha ajun ayushy acha Sarah ya kadambarimadhe ahe ashi ekmev kalakruti ahe mazya anushngane ji ajramar ahe. I love it very much very closed to my ❤
ReplyDelete