पुस्तकाचे नाव: चक्र
लेखक: जयवंत दळवी
म्याजेस्टिक प्रकाशन पाने :१६७ किंमत १०० रु
चक्र बद्दल बरच काही ऐकून होतो व शेवटी एकदाची कादंबरी हातात पडली. जयवंत दळवींची हि पहिलीच कादंबरी पण एक लेखक म्हणून ते किती भन्नाट लिहू शकतात ह्याची पुरेपूर साक्ष देणारी .
कादंबरीचं background म्हणजे मुंबईतील एक झोपडपट्टी. पुस्तक सत्तर च्या दशकांत पूर्वार्धाला लिहिल गेलं असल तरी अजूनही ते तितकंच वाचनीय आहे . झोपडपट्टीतील गरीब कुटुंब,त्यांची भाषा ,विचारसरणी,जगण्यासाठी करावा लागणारा आटापिटा ,बकाल पणाचे वास्तविक दर्शन अंगावर काटा आणते. आपल्यासारखा मध्यमवर्गीय पांढरपेशा माणूस अक्षरशः व्यतिथ होतो. कादंबरीत बकाल झोपडपट्टीत राहणाऱ्या बेन्वा ,त्याची आई,त्याचे मित्र ,तिथला तडीपार झालेला गुंड लुका ह्याच्या बरोबर कादंबरी पुढे जात राहते. त्याचे जीवनमान,आत्यंतिक गरिबीमुळे आलेलं अगतिक जीवन,एक वेळच्या भाकरीची भ्रांत असलेल्या रिकामटेकड्या माणसांची जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड त्यांनी झोपडपट्टी वासियांच्याच भाषेत समर्थपणे उभी केली आहे .
पराकोटीच्या गरिबीमुळे माणूस कुठल्या थराला जाऊन वागतो,त्यामुळे त्याच्या सुंदर स्वप्नांची धूळधाण कशी होते व नियतीचे हे दुष्ट चक्र कसे चालू राहते हेच पुस्तकात अक्षरश जिवंत केलय व पुस्तकाचं नाव सार्थ केलय. पुस्तकात शिवराळ भाषा शिवराळ न वाटता वास्तववादाकडे झुकते त्यामुळे ते आक्षेपार्ह नाही वाटत .एकुन एकदा वाचण्यासाठी पुस्तक छान आहे. पण एकदमच मस्ट रीड असं मात्र नाही .