Friday, 15 February 2013

चकवाचांदण एक वनोपनिषद -मारुती चितमपल्ली (chakwachandan-maruti chitampalli)

पुस्तकाचे नाव: चकवाचांदण एक वनोपनिषद       लेखक: मारुती चितमपल्ली      पाने:६८७        किंमत:५०० रु     मौज प्रकाशन     प्र आवृत्ती:२००५
                            

            जेव्हापासून मारुती चितमपल्लींची   नवेगावबंध चे दिवस व ranvata हि पुस्तक वाचली तेव्हापासून
 त्याचं आत्मचरित्र असलेल पुस्तक वाचण्यासाठी मी फार उत्सुक होतो .कुठेही मिळालं नाही तेव्हा सरळ विकतच घेतलं .तब्बल पावणे सातशे पानांचं हे पुस्तक म्हणजे एक अजब अनुभव आहे.लेखकांनी त्यांचा बालपणापासून ते सेवा निवृत्त होईपर्यंतचा कालखंड ह्यात लिहिला आहे.सुरुवातीचा काही भाग जेथे त्यांच्या कुटुंबाची ओळख आहे ,काहीसा कंटाळवाणा व अनावश्यक झालाय.मग एकदा का त्यांच करियर सुरु झाल कि मग सर्व भाग अचाट अनुभवांनी भरून गेलाय.वाचताना अपूर्व आनंद होतो.आज त्यांनी जे अनुभवलं ते सर्वसामान्य माणुस नाही अनुभवू शकत त्यामुळेच वाचताना त्यांचा हेवा वाटतो.बरीच नवीन माहिती मिळते,पक्ष्यांकडे झाडाकडे ,जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळते.
                नोकरीच्या कालखंडात लेखकाची अनेक वेळा बदली झाली त्यामुळे  पुणे,तामिळनाडू,म्हैसूर,पोंडेचरी ,महाबळेश्वर ,मावळ,पनवेल,नागपूर,नागझिरा ई ठिकाणच्या जंगलांचे ,निसर्गाचे प्राणी जगताचे अनुभव वाचायला मिळतात.कित्येक पक्ष्यांची नवे कळतात त्यांच्याविषयी माहिती मिळते .पुस्तकाच्या शेवटी साहित्यीकान्च्या सहवासात ह्या
ह्या सदरचे लेखन आहे त्यात लेखकाने त्याना  लाभलेल्या   अनेक साहित्यिकांचे सहवासाचे अनुभव लिहिलेयत.त्यात बाबा आमटे,गो नि दा,गंगाधर गाडगीळ ,व्यंकटेश माडगुळकर ,जी ए  इ बद्दल लेख आहेत.
      पुस्तक वाचनात आपल्याला निरनिराळी माणसे भेटत जातात जी आज हयात नाहीत पण त्यांचा चांगुलपणा,माणुसकी,श्रेष्टत्व,जाणतेपणा,अनुभव आपल्याला अंतर्मुख करतो.पावनीचे माधवराव पाटील,चित्रकार आलमेलकर ,टागसु  महाजन हे त्यापैकीच एक.

एकूण पुस्तक जरूर वाचावे असे.मला फार आवडले .पुस्तकातील काही आवडलेली वाक्ये व माहिती:

कळक बांबूला तीस ते साठ वर्षांनी फुलोरा येतो ,त्यानंतर ती बेटं मृत होतात.

प्रत्येक पक्व चंदनाच्या झाडाचा गाभा सुगंधी असेलच अस नव्हे .त्याला अपवादही असतात .अशा वेळी खोडात गिरमिट  घालून गाभ्यातील नमुना काढण्यात येतो.त्यावरून सुगंधी गाभ्याची खात्री होते

हत्ती हा अहोरात्र चरणारा प्राणी आहे.मधूनच काही वेळ जमिनीवर आपलं प्रचंड अंग टाकून तो आडवा होतो.हत्ती झोपला कि त्याच्या घोरण्याचा आवाज दूरपर्यंत ऐकु येतो.

डून म्हणजे रुंद आणि सपाट असं खोरं

जिम कॉर्बेट यांची पुस्तके :  man eaters of kumau / man eating leopard of rudraprayag, /My india 1952 / jungle lore 1953/ The temple tiger1954

जिकडेतिकडे भाताची खापर दिसत.वाटे कि समोर हिरवा समुद्र पसरला आहे.हवेत डोलणाऱ्या भाताच्या पिकावरून वारयाच्या झुळकेबरोबर हळुवार लाटा उठत.

मरण कुणाच्या ताब्यात आहे?पण जराजर्जर होऊन अंथरुणावरचं मरण मला आवडणार नाही.अंतरीची इच्छा आहे ,मृत्यु यावा तर अशा सह्याद्रीच्या कुशीत -गो नि दांडेकर -चकवाचांदण

 आर्थर कोअंस्लर ने एका ठिकाणी लिहिलंय हे जग दुष्ट लोकांनी भरलेलं असलं तरी थोडी माणस चांगली असतात.जग अश्या बोटावर मोजता येणाऱ्या चांगल्या माणसांवर चालतं.





     

1 comment:

  1. Mahan VanYogi.His book ChalvaChandana not available to read

    ReplyDelete