पुस्तकाचे नाव: काजळमाया लेखक: जी ए कुलकर्णी पॉप्युलर प्रकाशन पाने: २७८
जी ऐचं नाव ऐकून,त्यांच्याबद्दल एवढ सगळ वाचून मी त्यांची पुस्तक वाचायला बराच उत्सुक होतो.दोन तीन वाचली पण मनात भरली नाहीत एकतर ते अनुवाद होते किवा फार डोक्यावरून जाणारी वाटली.पण काजळमाया वाचल्यानंतर समजले,पटले कि जी ए काय चीज आहे ते.
ह्या लघुकथा संग्रहाला १९७३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.पुस्तकात एकूण १४ लघु कथा (साधारण २०-२५ पानाच्या)आहेत. जबरदस्त लेखन.उत्कृष्ट लेखनशैली,वाचताना माणूस spellbound होऊन जातो.कित्येक वेळा तर वाक्यावर थांबून आपण विचार करतो,दोन तीन चार वेळा ते वाक्य वाचतो ,समरसून जातो ह्यातच लेखकाचे यश आहे त्यांची विद्वत्ता दिसून येते.
साऱ्या कथा मानवी जीवनाच्या दुखाशी संबंधित.किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं किती वेगवेगळे त्यांचे आयुष्य व त्या सगळ्यावर त्यांची दुःखं .प्रत्ये कथेला निश्चित असा शेवट नाही.त्या पात्राशी निगडीत होत असताना आपण त्याच्या दुखात सहभागी होत असतानाच कथा संपतात आपल्याला त्याच कथानाकाभोवती भिरभिरत ठेवत .कितीही नाही आवडला तरी हा लेखनप्रकार मात्र जबरी आहे लेखकाने समर्थपणे मांडलाय.विदुषक,भोवरा,गुलाम अशा कित्येक कथा छान आहेत.प्रत्येक कथा म्हणजे वेगळ विश्व. कसं सुचत एवढ हाच विचार मनात येतो.मराठी साहित्यातील चांगले लेखन वाचताना ह्या पुस्तकाचा जरूर विचार व्हावा.

Thank you for the Review. I'm eager to start reading this book.
ReplyDeleteYou should read pingalvel also.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteचांगले लिहिलेत. मीही फेसबुकवर गेल्या चार-पाच वर्षात पुस्तकांवर १००+ टिपणं लिहिलीत.
ReplyDeleteनीतिन वैद्य
Delete