पुस्तकाचे नाव: शुभ्र काही जीवघेणे लेखक:अंबरीश मिश्र राजहंस प्रकाशन पाने:१५७ किंमत:१४०
पुस्तकाच्या मलपृष्ठावरील लिहिलेला संदर्भ अतिशय समर्पक शब्दात पुस्तकाबद्दल मत मांडतो.त्यात लेखक म्हणतो: कलेचा प्रवास धुंद करणारा असतो .यश,कीर्ती,मान -सन्मान हि या प्रवासातील रमणीय विश्राम् स्थळे असतील.परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाच मंथन करण्यातच मग्न असतात "शुभ्र काही जीवघेणे" शोधत असतात.आपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य,नाट्य,संगीत अन सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्तिमत्व या पुस्तकाला रेलून उभी आहेत.
सात मनस्वी कलाकारांच्या जीवन कहाण्या आणि त्यांच्या प्रतिभा प्रवासाचा वृत्तांत या पुस्तकात चिरेबंद आहे .यातले शुभ्र काही जीवघेणे जे जे आहे ते या कलावंतांचे आहे,जे नकोसे वाटेल त्याला मी कारणीभूत आहे असं लेखक नम्रतापूर्वक लिहितो.
चन्द्रदेवतेच गाणं हा शोभा गुर्टू वरील लेख आहे,अख्तरीबाई हा बेगम अख्तर यांच्या वरील लेख,चंद्रग्रहण हा सादत हसन मंटो वरील लेख,ओ पी नय्यर ,पार्श्व नाथ आळतेकर ,
,सज्जाद हुसैन,पंकज मलिक हि इतर मंडळी.पुस्तकात प्रत्येकाची छान माहिती लेखकाने दिलीये.पुस्तक मस्त आहे . मुळता सगळे लेख दिवाळी अंकामधून प्रसिद्ध झालेले आहेत व नंतर पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले आहेत.पुस्तकामुळे अनेक चांगल्या गुणी कलावंतांची,त्यांच्या आयुष्याची आपल्याला ओळख होते.