पुस्तकाचे नाव: वाटा आडवाटा लेखक: वामन होवाळ रिया पब्लिकेशन पाने:१४४ किंमत:१४०
ह्या लघुकथा संग्रहात लेखकाच्या दहा कथांचा समावेश आहे.सर्व कथा ८६-८७ सालांमध्ये वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये (कामगार,आकंठ ,व्यासपीठ,रसस्वाद ई )प्रसिद्ध झालेल्या आहेत.प्रथम पुस्तकाचे मुखपृष्ट पाहून कुठल्यातरी भ्रमणकथा असतील असे वाटलेले पण तसे नाहीये.कथा वेगवेगळ्या बाजाच्या ,वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.
काही कथा अगदीच साध्या आहेत,काही मात्र छान आहेत .मलातरी पाटीलकी,ढवाळ ,नवी वाट ह्या कथा आवडल्या.वाटा आडवाटा तर अजिबात आवडली नाही ,कथा जाम फसलेली आहे.एकूण लेखन /पुस्तक ठीक आहे पण बऱ्याच ठिकाणी लेखनात बौद्ध समाजाचा ,त्यातील लोकांचा उल्लेख , बाबा साहेबांचा उल्लेख आहे, तो खरच अनावश्यक वाटतो काही ठिकाणी ठीक आहे ,संदर्भ म्हणून चपलख बसतो पण त्या गोष्टीची लेखकाने पुनरावृत्ती केलेली आहे बरयाच ठिकाणी जी कि नसती तरीही कथा वेगळी झाली नसती.
प्रशांत पं. मयेकर १मार्च १३_२१.१५
No comments:
Post a Comment