पुस्तकाचे नाव: प्रिय जी. ए. लेखिका: सुनीता देशपांडे मौज प्रकाशन कि:२०० पाने:१८८
प्रिय जी ए म्हणजे लेखिकेने प्रसिद्ध लेखक जी ए कुलकर्णींशी पत्रलेखनातून केलेला संवाद.थोडक्यात ह्या पुस्तकात लेखिकेने जी ए'ना लिहिलेली पत्रे आहेत.पत्रे फक्त सुनिता ताईनीच लिहिलेली असल्यामुळे व त्यांना आलेली उत्तरे ह्या पुस्तकात समाविष्ट नसल्यामुळे काहीस अपूरं राहिल्यासारखं वाटतं पण त्यांची लेखनशैली,एकूण विचार,मते,जी एं च्या आदल्या पत्रातील संदर्भ ह्यामुळे तितकाही काही मोठा अडथळा वाचताना जाणवत नाही.
साधारण ८५ सालापर्यंत चाललेला हा पत्र सोहळा कालांतराने पुस्तकरूपाने आला.सुनिता ताइंचे जी ए हे आवडते लेखक ,पु लं बाहेरगावी गेल्यामुळे लेखिकेने त्यांना पत्रोत्तर केले व हि श्रुखला चालूच राहिली.जी ए व लेखिका यामध्ये परिपक्व ,जिव्हाळ्याची ,वैचारिक देवनघेवनिचि ,मत-मतातरांची ,आपुलकीची मैत्री दिसून येते.पुस्तक वाचताना वाचकासाठी लेखिका केवळ पु ल च्या पत्नी राहत नाहीत तर स्वतंत्र,प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून समोर येतात.त्यांचे विचार,लिहिण्याची पद्धत ,एकूण विचारसरणी वाचकाला खिळवून ठेवते व त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण होतो.
जी ए म्हणजे कोशात राहिलेले लोकांचे आवडते व्यक्तिमत्व.त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला त्यांचा प्रत्येक वेडा वाचक अगदी उत्सुक असतो. ह्या पत्रांमधून देखील काही प्रमाणात जी ए समजतात.काही बाबतीतील त्यांची मते समजतात.आजकाल पत्र लिहिण तसं काल बाह्यच झालंय पण हि अतिशय सुरेख पत्रं वाचली कि त्यातील गोडवा जाणवतो.आपण काय चुकवतोय ते देखील जाणवतं .असो हे थोड विषयांतर झालं पण पुस्तक सुरेख आहे.एकदा तरी नक्की वाचण्या सारखे.
दोन प्रगल्भ व्यक्तींमधल्या विचारांची देवाणघेवाण हि सहसा शब्दरूपात अनुभवायला मिळत नाही.पत्रे जुनी असली तरी काळाच्या बंधनात अडकणारी नव्हेत.
--- प्रशांत मयेकर १ मार्च २०१३_ २०.३५

खरयं तुमचं म्हणणं, हे पुस्तक काळाच्या बंधनात अडकणारं नाहीच मुळी.
ReplyDeleteआणखी 10 वर्षांनी वाचलंतरी मला वाटतं त्याचा ताजेपणा तसाच राहील.
सुनिता बाईंचं लेखन अनेक प्रसंगी मनात घर करून राहतं.