Saturday 26 January 2013

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती -बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन-- डॉ ह वि सरदेसाई

पुस्तकाचे नाव: घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती -बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन      लेखक:डॉ ह वि सरदेसाई
उत्कर्ष प्रकाशन    १७ वे पुनामुद्रण :२०१२   किंमत-१०० रु   पाने:१६०
   
                         माझ्या एका मित्राने मला आवर्जून हे पुस्तक वाचायला सांगितलेल.नावाप्रमाणेच हे पुस्तक बाल संगोपनावर मार्गदर्शन करता.लेखकाने खूप चांगल्या भाषेत मुलांना कस समजावून घ्याव ते कसे संस्कार करावे त्यासाठी आई वडिलांचा काय व्यवहार असावा कोणता stand असावा ,त्यांनी स्वत कसे वागावे जेणेकरून मुलामध्ये चांगले बीज पेरले जाईल हे सांगितलय.
  खुद्द प्रकाशकांनी प्रस्तावनेत लिहिलंय कि मुलांना समर्थपणे वाढवायची पूर्वतयारी करायची म्हणजे स्वतःच थोड नव्याने मोठं व्हायचं.आजवर ऐकून असलेली किंवा ऐकलेली  नसलेलीही माहिती करून घ्यायची.मुलाच्या शरीराची,मेंदूची,बुद्धीची वाढ केव्हा कशी होते आणि या वाढीला पालकाला कसकसा हातभार लावता येतो हे समजून घ्यायंच."समजावून देण्याच्या " याच भूमिकेतून डॉ सरदेसाई यांनी परिश्रमपूर्वक हे पुस्तक लिहील आहे.उदाहरणांनी विषय सोपा आणि समजेल असा स्पष्ट केला आहे.
        एकूण पुस्तक छान आहे.अगदी काही भाग अनावश्यक वाटत असला तरी जरूर वाचावे व आचरणात आणावे.
पुस्तकातील काही  वाक्य:
माणसापुढे दोन मार्ग आहेत.एक मार्ग प्रेयसकडे नेणारा म्हणजे तत्काळ सुख देणारा आहे तर दुसरा मार्ग श्रेयस कडे नेणारा म्हणजे हिताचा.जी व्यक्ती श्रेयसचा मार्ग निवडते ती सुबुद्ध असते
शास्त्र सांगते कि नकाराचा सारखा वापर करून तसं फारसं काही साध्ण्यासारख नसत.नकारापेक्षा त्या नकारच रुपांतर जर होकारात करता आलं ,म्हणजे एकाएकी दुसर काही बदली देता  आलं ,पर्यायी आनंदाचा शोध लावून देता  आला तर गोष्टी खूप सोप्या आणि सरळ घडवता येतात.
अपयश आलं तरी नाउमेद न होता पुन्हा उभारी धरावी लागते ,फुकटात घरबसल्या काही मिळत नाही या विचाराचे बाळकडू बालपणातच मिळण    इष्ट असतं .



Tuesday 8 January 2013

एका रानवेड्याची शोधयात्रा-कृष्णमेध कुंटे(eka ranvedyachi shodhyatra-krushnamedh kunte)

पुस्तकाचे नाव: एका रानवेड्याची शोधयात्रा             लेखक: कृष्णमेध कुंटे           राजहंस प्रकाशन         किंमत:२००
   
                     बऱ्याच दिवसांपूर्वी वाचलेल हे पुस्तक .नाव वाचूनचं वाटल म्हणून लायब्ररीमधून मागवलेलं ! लेखक bsc करताना  नापास झाले. प्रयत्न करूनही त्यात  ते पास होऊ शकले नाहीत .मग त्यांच्या सराच्या  phd मध्ये मदत करण्यासाठी ते madumali च्या जंगलात गेले.तेथे हत्ती व रानगवे यांचे संशोधन करताना मदुमलाई व तेथील जंगल परिसर अव्याहत फिरले ,मनापासून फिरले ,जंगलाशी एकरूप होऊन फिरले .कधी एकटे तर कधी माग काढ्याना घेऊन .तेथील वास्तव्याची कथा ,आलेल्या अनुभवांची  कथा म्हणजे हे पुस्तक होय. त्यानंतर त्यांना जीवनाचा अर्थ गवसला ते परत येउन त्यांनी शिक्षण पूर्ण केले व नंतर  पी एच डी पण केली.
                      पुस्तक खूप छान  लिहिलंय.निसर्गाविषयी आपुलकी व उत्सुकता असणारया  कुणालाही ते भावेल.तेथील आदिवासी  मागकाढे ,त्यांच्याशी लेखकाची मैत्री ,त्यांच्याबरोबर जंगलात फिरताना मिळालेली बहुमुल्य माहिती ,रान कुत्र्यांचा  माग काढताना केलेला अविश्वसनिय प्रवास ,तेथील जंगलांचे वर्णन ,हत्ती विषयी माहिती ,त्याचा पाठलाग व  अभ्यास ,रान  गव्यांची  माहिती,विरप्पन चे प्रकरण काय काय अन किती...एक झकास पुस्तक  ...पुस्तक वाचल्यावर आपण त्या जंगलाच्या त्या जागेच्या प्रेमात पडतो एकदातरी तिथे जावे त्या सगळ्याचा नाही तरी त्या अदभूत जागेचा अनुभव घ्यावा असे सारखे वाटते हेच लेखकाचे यश.