Thursday 21 February 2013

स्वतःविषयी --अनिल अवचट (swatavishayi-anil avchat)

पुस्तकाचे नाव :  स्वतःविषयी    लेखक:अनिल अवचट      मौज प्रकाशन      प्र आ: १९९०     पाने:१५३       किंमत:१२०रु

                                                                                 
 पुस्तकाचे नाव   स्वतःविषयी असले   तरीही हे आत्मचरित्र नाही .ह्यातील बहुतेक सर्व लेखन पुस्तकरूपाने येण्यापूर्वी   मौज ,सत्यकथा, किर्लोस्कर या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेलं.लेखकानेच पुस्तकामध्ये सांगितल्या प्रमाणे त्यानंतर काही मित्रांनी आत्मचरित्र लिहितोयस असा  म्हटल्यावर त्यांना तसं वाटेना .आत्मचरित्र असते तर भोवताली व्यक्ती,तत्कालीन महत्वाच्या घटना ,ई सर्व काही दिले असते .घटनाक्रम दिला असता.पण तसा उद्देश नव्हता.माझ्या परीने मी पूर्वायुष्यात बुडी मारून काही अनुभव किंवा दृश्री घेऊन बाहेर येत होतो अस ह्या पुस्तकाच्या बाबतीत त्याचं मत आहे.
       पुस्तक एकूण पाच टप्प्यात लिहिलेय. दहावीचे वर्षं ,डॉक्टरी,मुक्काम नानापेठ,धार्मिक आणि संगोपन.लेखकाची दहावी मधली मजा ,होस्टेल लाइफ ,त्याचं वाहवत जाण हे सगळ दहीवीचे वर्षं मध्ये येतं.डॉक्टरी पण मस्त लिहिलंय.तिथले अनुभव अंगावर काटे  आणतात पण मजाही येते.सगळ्यात मस्त आहे ते संगोपन.लेखकाला दोन मुली.त्यांच्या जन्माच्या आठवणी,त्यांचे संगोपनाचे किस्से,त्याचं मोठ होणं शिकणं त्यात एक वडील म्हनूण  लेखकाचा वाटा  ,त्यात त्यांचे विचार मस्त जुळून आलेयत.एकदा जरुर  वाचावे असे पुस्तक.शेवटचे प्रकरण तर मस्ट च .
लेखकाचे प्रस्तावनेतील पुस्तकावरील मत मला फार आवडले ते असे : लिखाण हि माणसाची निर्मिती ,म्हणून त्याचे ते मुल मानतात.पण मला ते अनुभव शिकवणाऱ्या वृद्ध पित्यासारखे वाटतेय.लिखाण हे माझ्यापेक्षा मोठे ,कारण त्या लिखाणातल्या अनेक व्यक्तींमध्ये वावरणारी,सुख दुखे भोगणारी,चुका करणारी मी हि एक व्यक्ती आहे.माझे डोळे उघडणाऱ्या ह्या लेखनाविषयी कुणाहीविषयी नसेल एवढी कृतज्ञता माझ्या मनात आहे.
          एकूण मला अनिल अवचट आवडत चाललेले आहेत .लवकरात लवकर त्यांची सारी पुस्तके वाचायचा प्रयत्न करणार .

प्रशांत पं मयेकर ,२१/२/१३ ,२१.३०

No comments:

Post a Comment