Tuesday 20 November 2012

शाळा --मिलिंद बोकील

पुस्तकाचे नाव :शाळा
लेखक: मिलिंद बोकील
मौज प्रकाशन  ,    पाने : ३०३
किमत:२०० रु
         २०१२ मध्ये शाळा चित्रपट (ह्या पुस्तकावर आधारित )आल्यामुळे ह्या वर्षी पुन्हा एकदा ह्या पुस्तकाची जोरदार चर्चा झाली .२००३ साली प्रकाशित झालेला हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालंय.चित्रपट म्हणजे केवळ मुळ  कथेला ५०% च न्याय दिलाय अस माझ वैयक्तिक मत आहे.
   पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे.नववी त शिकणाऱ्या एका मुलाची हि कथा ७०-८० च्या दशकात घडलेली डोंबिवली मध्ये .त्या वेळे तरी डोंबिवली गावच होत.या वयात आणि त्या काळात जे काहि एखाद्या किशोरवयीन विद्यार्थ्याच्या बाबतीत  घडु शकेल त्याची जबरदस्त कहाणी म्हणजे शाळा .पुस्तक कुठेहि  खोटे वाटत नाही.सगळी पात्रे आपल्यासमोरच उभी आहेत असे वाटते.सर्व लेखन एकदम ओघवत्या भाषेत .सुममधे, डाऊट खाणे,  लाईन देणे ,इचीभन असे काहि खास शब्द लेखकाने वापरले आहेत.पुस्तकातली पात्र  म्हणजे मुकुंद , सुर्‍या, चित्र्या, सुकडी, केवडा,नरु मामा ,बहिण अंबाबाई सगळी पात्र झकास.पुस्तक एक उत्तम वाचनीय अनुभव.
            मुकुंद जोशी ची नववीतील हि कहाणी मग त्यात मित्र आहेत ,प्रेम आहे ,मस्ती आहे ,शिव्या आहेत,तत्कालीन परिस्तिथी चा वर्णन आहे , प्रेमासाठी केलेले उपद्व्याप आहेत ,नंतरची विलक्षण हुरहूर आहे.पुस्तक संपता संपता आपण पण मुकुंद जोशी आपलाच कुणी आहे असे समजू लागतो  मस्ट रीड .

No comments:

Post a Comment